PMGDISHA: benefits and registration?

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान PMGDISHA या योजनेची सुरुवात आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत करण्यात आली असून,या योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे या योजनेचे उद्देश्य, वैशिष्ठे, फायदे, पात्रता, Online Registration, ते आपण आज बघणार आहोत. PMGDISHA या योजने अंतर्गत भारत सरकार देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक व डिजिटल उपकरणे ( उदा. स्मार्ट फोन, टॅबलेट, इ. ) यांचे प्रशिक्षण देऊन, ईमेल पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट चालवणे, इंटरनेटवरून सरकारी सुविधा मिळवणे, इंटरनेटवर माहिती शोधणे आणि ऑनलाइन पेमेंट करणे इत्यादी प्रशिक्षण दिले जाईल.

PMGDISHA Scheme 2023

 • देशातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे अभियान राबविण्यात आले असून, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचा लाभ ग्रामीण कुटुंबांना होणार आहे. ज्यां कुटुंबातील सदस्य डिजिटली साक्षर नाहीत आणि त्या कुटुंबातील कोणालाही संगणक उपलब्ध नाही माहिती नाही कुटुंबात घरातील प्रमुख, त्याची पत्नी, मुले आणि पालक असतात. या योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला संगणका विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यांना योजनेचा लाभ घेऊन PMGDISHA योजने अंतर्गत प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्यांना योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

PMGDISHA Objective – प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान उद्देश्य

 • ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक किंवा डिजिटल ऍक्सेस उपकरणे (जसे की टॅब्लेट, स्मार्ट फोन इ.) चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम करणे, ई-मेल पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट ब्राउझ करणे, सरकारी सेवांमध्ये प्रवेश करणे, माहिती शोधणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. इ.

PMGDISHA Eligibility – प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान पात्रता

 • अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे
 • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
 • अर्जदाराचे आधार कार्ड.
 • अर्जदाराचे ओळखपत्र.
 • अर्जदाराचे वय प्रमाणपत्र.
 • अर्जदाराचे मोबाईल नंबर.
 • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचा फोटो.

PMGDISHA Registration 2023 – प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान Registration Process

 • सर्व प्रथम PMGDISHA Registration करण्यासाठी अर्जदाराला अधिकृत वेबसाइट https://www.pmgdisha.in/ वर जावे लागेल. वेबसाइट वर गेल्यावर तुमच्या समोर pmgdisha चे मुख्यपृष्ठ उघडेल. या मुख्यपृष्ठावर तुह्माला Direct Candidate पर्याय दिसेल.
 • तुम्हाला Direct Candidate या पर्यायावर क्लिक करावे लागेल. वर क्लिक केल्यानंतर Login फॉर्म ओपन होईल.
 • या लॉगिन फॉर्मच्या खाली तुम्हाला Register पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर Registration फॉर्म ओपन होईल.
 • या Registration Form मध्ये, तुम्हाला UIDAI क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, लिंग, जन्मतारीख इ. अशी विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि खाली दिलेल्या सूचना वाचून चेक मार्कवर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर Add वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला EKYC करावी लागेल ती तुह्मी दोन पद्धतीने करू शकता फिंगरप्रिंट स्कॅन करून किंवा डोळे स्कॅन करून. ज्यांच्याकडे फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा रेटिना स्कॅनर नाही ते तिसरा पर्याय निवडू शकतात जो मोबाइल फोन ओटीपी पडताळणी आहे.
 • यासाठी तुम्हाला वैध मोबाईल नंबर द्यावा लागेल, ज्यामध्ये OTP पाठवला जाईल. OTP टाकल्यावर ‘Validate OTP‘ यावर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्ही विद्यार्थी टॅबवर जाऊन तुमची सर्व माहिती तपासू शकता. एकदा नोंदणी झाल्यानंतर, विद्यार्थी त्यामध्ये User Name आणि Passward तयार करून त्यांचे नवीन खाते उघडू शकतात..

PMGDISHA प्रशिक्षण केंद्र कसे उघडावे

 • देशातील ते इच्छुक लाभार्थी ज्यांना स्वतःचे खुले प्रशिक्षण केंद्र उघडायचे आहे, तर तुम्हाला प्रथम CSCSPV प्रशिक्षण भागीदार व्हावे लागेल.
 • प्रशिक्षण भागीदार कोणतीही NGO, संस्था किंवा कंपनी असू शकते. भागीदार होण्यासाठी काही निकष पूर्ण केले पाहिजेत. प्रशिक्षण भागीदार म्हणून भारतात नोंदणीकृत संस्था असावी.
 • तीन वर्षांहून अधिक काळ शिक्षण/आयटी साक्षरता क्षेत्रात व्यवसाय करणे आणि कायम खाते क्रमांक (PAN) असणे आणि किमान गेल्या तीन वर्षांचे लेखापरीक्षित विवरणपत्र असणे.
PMGDISHA Grievance Redressal – प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान तक्रार निवारण
 • तुम्हाला तक्रार निवारण करायचे असल्यास तुम्हाला कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक ईमेल पाठवावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला तक्रारीशी संबंधित माहिती लिहायची आहे. तुम्हाला हा ई-मेल grievances@pmgdisha.in वर पाठवावा लागेल.
PMGDISHA RD Installation User Manual
 • https://www.pmgdisha.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला Traning लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • RD Installation User Manual & FAQs लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • RD Installation User Manual तुमच्या समोर उघडेल.
 • तुम्ही RD डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता.

PMGDISHA TC Locator App Download –

 • https://www.pmgdisha.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला Traning लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला PMGDISHA TC Locator App Download च्या लिंकवर क्लिक करावे लागेल
 • तुम्ही या लिंकवर क्लिक करताच हे PMGDISHA TC Locator App Download होण्यास सुरुवात होईल.
 • PMGDISHA TC Locator App Download झाल्यावर तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता.

Disha Registration App Download –

 • https://www.pmgdisha.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
 • आता तुम्हाला Traning लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्हाला Disha Registration App Download च्या लिंकवर क्लिक करावे लागेल
 • तुम्ही या लिंकवर क्लिक करताच हे Disha Registration App Download होण्यास सुरुवात होईल.
 • Disha Registration App Download झाल्यावर तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता.

PMGDISHA Learning App Download –

 • https://www.pmgdisha.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
 • आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल
 • आता तुम्हाला Traning लिंकवर क्लिक करावे लागेल
 • यानंतर तुम्हाला PMGDISHA Learning App च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • तुम्ही या लिंकवर क्लिक करताच हे PMGDISHA Learning App Download होण्यास सुरुवात होईल.
PMGDISHA Helpline Number – प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान हेल्पलाईन क्रमांक
 • PMGDISHA संबंधी काही प्रश्न किंवा समस्या असतील तर आपण 1800 3000 3468 या क्रमांकावर कॉल करून जाणून घेऊ शकता किंवा आपण helpdesk@pmgdisha.in वर ईमेल देखील करू शकता आणि आपण आपल्या समस्या आणि प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
PMGDISHA Full Form?
 • pmgdisha या योजनेचा full form प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान आहे. PMGDISHA या योजने अंतर्गत भारत सरकार देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक व डिजिटल उपकरणे ( उदा. स्मार्ट फोन, टॅबलेट, इ. ) यांचे प्रशिक्षण देऊन, ईमेल पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट चालवणे, इंटरनेटवरून सरकारी सुविधा मिळवणे, इंटरनेटवर माहिती शोधणे आणि ऑनलाइन पेमेंट करणे इत्यादी प्रशिक्षण दिले जाईल.
PMGDISHA Certificate Download
 • PMGDISHA Certificate प्रशिक्षणानंतर चाचणी घेतली जाते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या लाभार्थ्यांना Certificate दिली जातील.
 • PMGDISHA Certificate Download करत असताना काही अडथळा आल्यास खालील संपूर्ण विडिओ बघा.

PMGDISHA Certificate Download

महाराष्ट्र वन विभागामार्फत ‘वनरक्षक’ पदाच्या २४१७ पेक्षा जास्त जागांसाठी भरती जाहीर!

PMGDISHA काय आहे?

PMGDISHA म्हणजे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान ( PMGDISHA ) या योजनेची सुरुवात आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मार्फत करण्यात आली असून, PMGDISHA 2023 Online Registration कसे करायचे, या योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे या योजनेचे उद्देश्य, वैशिष्ठे, फायदे, पात्रता, Online Registration, ते आपण आज बघणार आहोत. PMGDISHA या योजने अंतर्गत भारत सरकार देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक व डिजिटल उपकरणे ( उदा. स्मार्ट फोन, टॅबलेट, इ. ) यांचे प्रशिक्षण देऊन, ईमेल पाठवणे आणि प्राप्त करणे, इंटरनेट चालवणे, इंटरनेटवरून सरकारी सुविधा मिळवणे, इंटरनेटवर माहिती शोधणे आणि ऑनलाइन पेमेंट करणे इत्यादी प्रशिक्षण दिले जाईल.

1 thought on “PMGDISHA: benefits and registration?”

Leave a Comment